Posts

Showing posts from 2019

आयुष्य(प्रेम कवीता )

Image
आयुष्य निष्पर्ण आयुष्यात माझ्या वाहतो मायेचा गारवा आसवांचे डोळ्यात पाट विसावला ह्रदयात पारवा! नजरभेटीची कहानी तुझी दुःखात आयुष्याची वाटणी प्रेमळ तुझ्या स्पर्शाने आनंदली जीवनाची कहानी! माझ्या आसवांचे मोल नजरेत मायेची ओल सहवासात आज तुझ्या मोगरा प्रीतीचा फुलेल! जाऊ नको दुर देशी विरहाची तुझी गाणी मायेच्या तुझ्या स्पर्शाने ओसंडले डोळ्यात पाणी! काहुर तुझ्या मनाचे ऊघडली आपुलकीची दारे वेदनेच्या तुझ्या वाटेत धिक्कारीन स्वार्थाची घरे! कवी~गजानन चिंचमलातपुरे अमरावती

तु सोबतच तर असतो,

Image
तु सोबतच तर असतो, तु सोबतच तर असतो, तु दुर कधी गेलाच नाही, माझ्या डोक्यात ,विचारांन मधे, तुझ्याशीच तर बोलत असते, तुझ्यावर रागवते,चिडते,तुझ्यावर हसते,बघ , तु सोबतच तर असतो, कधी दुर गेलाच नाही, कधी कधी माझी इच्छा नसतांना हसवतो,मला अजिबात हसावायच नाही मला आज ,भाड़ायचे आहे, तरी तु हसवनारच, मला बोलायच नसत तरी बोलणारच,मला बोलत करणारच, माझी राणी माझी सोनु बेटा बेटा, करुन माघे माघे असणारच,बघ ना, तु सोबतच तर असतो, दुर कधी गेलाच नाही, रोज जेवन करतांना सोबतच तर, असतो,मला घास भरवनार, पाणी सुध्धा तुच पाजनार, मला टाकुन येक घास,खात नाही, कुठे बसलाच जेवायला तरी म्हणतो, बसतो ग जेवायला तु पन जेव,बघ ना, तु सोबतच तरअसतो, दुर कधी गेलाच नाही, गेलोच कुठे फिरायला, तर हातात हात गुफलेलाच असतो, गजरा माळतेस का, आन मी माळतो, सोबतच आइसक्रीम खातो, सोबतच चौपाटी वर फिरतो, कुणा कुनाला घाबरत नाही, बघ ना, तु सोबतच तर असतो, दुर कधी गेलाच नाही, नसलाच कधी सोबत, काही कारनास्तव, तुझे प्रेम ,तुझा सहवास,तुझ्या सोबत, घालवलेला प्रत्येक क्षण , फिरतो अवती भोवती, बघ ना , तु सोबतच तर अ...

मायेची ओढ(प्रेम )

Image
मायेची ओढ वाटेत आज माझ्या हसरी चांदण्यांची फुलबाग लाभला तिमीरास सुवास आळविन सप्तसुरांचा राग! शोधीला तु बहाना अश्रुंचा डोळ्यात खजाना संघर्षाच्या तुझ्या वाटेत गाईन मायेचा तराना! प्रीतीच्या तुझ्या पंखावरी मैफील मायेची रंगली ओढ नजरेत प्रेमाची भावना शब्दात गुंतली! आठवणींची मनात गर्दी आपुलकीची वाट मोकळी मायेच्या तुझ्या अंगणात फुलणार ह्रदयाची कळी! शोधीला मी आसमंत चहुकडे दुःखांचे डोंगर ममतेचे शितल द्वार गंधाळले बहीणीचे घर! गहिवरली आठवण प्रेमाची पाजळली संध्यासमयी ज्योती दुर क्षितीजावर गहिवरली ह्रदयात मायेची प्रीती! ...कवी~गजानन चिंचमलातपुरे (अमरावती)

वेडी माया (प्रेम कविता)

Image
वेडी माया (प्रेम कविता) पाहिले मी स्वप्न वेड्या जीवाच्या आशेचे कुठे शोधु गारवा दिप ह्रदयात दुःखाचे! वेड्या मनात आज गोडवा मायेचा खास ध्यास तुझा रात्रंदिन नजरेत कोरडाच भास! भरविला घास सुखाने दुःखाचे जिंकले कडे मायेच्या तुझ्या सुखात गाईन आयुष्याचे पोवाडे! डोळ्यात तुझी मूर्ती चहुकडे मायेच्या भिंती असे लिंपन संस्काराचे हिच जीवनाची निती! आयुष्याची असे जीवननौका गातो समाधानात पारवा नजरेत आज माझ्या झोंबतो ममतेचा गारवा! येशील कधी तु हरविला वादळात किनारा तुझ्याच प्रेमळ स्पर्शाने गुंफीतो मी सहारा!                कवि~गजानन चिंचमलातपुरे      (अमरावती)

डोळे रडून गेले.

Image
          डोळे रडून गेले. पाहून हाल माझे, सारे निघून गेले ना सांगता मला रे, डोळे रडून गेले! हे दुःख अंतरीचे, सांगू तरी कुणाला, राखून ठेवलेले, नाते जळून गेले! शेतात पीक माझ्या, आलेय जोम धरुनी, बाजार भाव त्यांचा, कोणी गिळून गेले! आश्वासने किती हो, देतात लोक नेते, ते काम साधताना, कोठे पळून गेले! सोसून घाव मोठे, आहे उभा किनारा, ते दुःख या जगाचे, त्याला कळून गेले! तापू नको गड्या तू,  होऊन सूर्य आता, वेड्या तुझ्या धरेला, सारे हसून गेले! विश्वास ठाम आहे, सांगून साथ केली, पाहून संकटाला, सारे दुरून गेले!         कवी~धनाजी जाधव.

अस्तिनातले निखारे

Image
सध्याच्या राजकिय स्थिती अस्तिनातले निखारे निवडणुक आली जवळ वडाच्या पारावरही रंगू लागल्या राजकीय सभा अन सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी राजकिय पुढार्यांनी पिंजून काढला महाराष्ट्र उभा...!! हात जोडूनी नतमस्तक झाले कुणी पडले सर्वसामान्यांच्या पाया पाच वर्षे जनतेस लाथाडुन सत्ताधारी अन विरोधक आले बायबापड्यांचा आशिर्वाद घ्याया...!! रोजच काय मग मटनाची पार्टी अन दारूचे प्याले... आधारस्तंभ हे उद्याचे मदिरेच्या नशेत  झिंगले...!! हजार पाचसे रूपयांसाठी टाकला आम्ही आमचा स्वाभिमान गहाण... ओरडलोत त्यांच्यासाठी प्राणपनाने पण त्यांनी समजले आम्हास पायताण...!! गरज सरो अन वैद्य मरो  म्हणतातना हेच खरे असतात एकाच माळेचे मणी सुई दोर्यात ओवले जातात सारे भेटताच संधी फुलतात अस्तिनातले निखारे...!!        ~ज्ञानेश्वर दिगंबर काळे

प्रेम तुझं नव्यान

Image
प्रेम तुझं नव्यान ❤ तुझे प्रेम न शब्दात न सुरात मला बोलता येत, कारण तुझ्या पुढे सारे मला फिके वाटे सवे गं, तु वाटे चंद्राची चांदणी जशी मन करी माजे बेहोश गं काय देऊ तुला उपमा या मजवरील तुझ्या प्रेमाला प्रेम म्हणजे इतिहास जो जुना होऊनी नव्याने परत रचला इतिहास तुच नव्हते मनी ध्यानी कधी येशील परतुनी तु माझ्या मनी             कवी~संजय रामचंद्र पाटील,      

वळणावरचा खोपा..

Image
वळणावरचा खोपा ------------------------- परत कधी तरी वळतील वळणावर पाऊले तुझी ते काट्यांच कुंपण तुला छळणार नाही ! छळले जरी मला  त्या लाख सावलीने उन्हाची तिरीपही आता तुझ्यावर पडणार नाही ! बघ अजुनही डोलतो तिथे तो खोपा सुगरणीचा वाऱ्यासंगे झुलणाऱ्या खोप्यात तुला पील्लाचा घोंगाट ऐकु येणार नाही ! बसतात तिथे आता वटवाघुळांचे उलटे लटकलेले थवे चमकऩाऱ्या डोळ्यात त्यांच्या आता चांदण्यांची सर येणार नाही ! गेली रात उलटुनी अशीच आता दिवस ही जातील रोज निघुनी याद होती ती जुणी गं आता पुन्हा नव्याने येणार नाही !               कवी ~सुभाष उमरकर (नाशिक)

दर्शन ...

Image
    ll दर्शन ll आई तुझ्या भेटीसाठी मन होई वेंधळं तुळजाई ममता तुझी जणु पाण्यानं भरलेलं कल्लोळ पाहुनीया रूप तुझं दिपलं माझं डोळं भक्तीभावाचा वाजवुनी संबळं घालीतो गं आई तुझा गोंधळ ll अवघड किती तुळजापुराचा घाट डोंगरातुनी जाते वळणाची वाट आईचा माझ्या मराठमोळा थाट वाहती गायमुखातुन अखंड त्या जलधारा नवसाच्या पाळण्याला नतमस्तक होई भक्तजण सारा तुळजाई शेजारी आदिमाया शक्ती पाप वासनेपासुनी देई ती मुक्ती ll अखेर झाले आई तुझे दर्शन पावण झालो तुझ्या पदस्पर्शानं आई राजा उदो उदो बोलतो मोठ्या हर्षानं       कवी ~ज्ञानेश्वर दिगंबर काळे (ब्रम्हगांवकर) मुकुंदवाडी,औरंगाबाद.

संस्कार ..

Image
        संस्कार आनंदाला आली भरती फुले वाटेत संस्काराची आपुलकीने बहरली नाती उगवली पहाट मायेची! होता किनारा वादळाचा कुंठीत मती सुखाची तुझ्या  प्रेमळ स्पर्शाची ऊपमा असे संस्काराची! नात्यात नसे अबोला गंधाळला प्रीतीचा वारा मायेच्या तुझ्या  पदराला आसवांचा आधार खरा! नको तोडुस भवबंध मायेच्या तुझ्या  सावलीत भिरकावु स्वार्थाची लक्तरे बहरली ह्रदयात प्रीत! तुझ्या आसवांचे मोल मुखात संस्काराचे बोल गाईन प्रीतीचे पोवाडे आपुलकीची नजरेत सल! धिक्कार असे स्वार्थाचा रक्ताचा जिथे कोंडमारा प्रेमाच्या तुझ्या  बागेत गंधाळला आसमंत सारा!               कवि~गजानन चिंचमलातपुरे (अमरावती)

आयुष्यं ...

Image
      आयुष्य आयुष्याची माती झाली अन् नाती गोत्यात आली, उभे कल्पवृक्ष तरू जळून गेले अवस्था हीनदीन झाली. सोडवायचे जे होते ते प्रश्नही उरले झाकण्या न आभाळ पुरले, मग असेच उडवून शब्दांचे फवारे केले सैरभैर जनसैलाब सारे. कुणी आकाशाला घाली गवसणी स्वार्थ साधण्या सवय जुनी, नांगरालाही मिळावी साथ घामाची पिकवण्या सोने शेतातूनी. पुन्हा तीच दरवळ,दर्प मातीचा शिडकावा पावसाचा तेच शरीर अन् तोच क्षणभंगूर खेळ जीवनाचा.         सुप्रसिद्ध कवयत्री~ कविता ताई कोर .

काळी हळद महत्व ..

Image
                          आरोग्य प्रभात                           * काळी हळद * *काळी हळद शास्त्रीय नाव:Curcuma caesia* *हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.* *या वनस्पतीची लागवड बंगालमध्ये होते. याचे ताजे गठ्ठे फिक्कट पिवळे असतात. मुख्य गठ्ठ्याचे बाजूचे गठ्ठे आल्यासारखे दिसतात. बाजारांत मिळणारे गठ्ठे काळसर करडे असून त्यांवर गोल कडीं असतात. आंतून करडा काळा रंग, फारच कठीण व शिंगासारखे, ह्याच्या पातळ चकत्या करड्या नारिंगी रंगाच्या; वास व रुची कापरासारखी. बंगालमधे ताजे गठ्ठे हळदीसारखे वापरतात.* *हळदीचे काही प्रकार आहेत त्यात काळी हळद हा एक प्रकार आहे. काळी हळद वशीकरण, कोर्ट केसेस मध्ये विजय, राजकारण मध्ये विजय, भूत बाधेपासून सुटका करून घेण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्ती साठी उपयोगात आणली जाते. काळ्या हळदीचे रोप हे कण्हेरीच्या झाडासारखे असते परंतु फरक हा असतो की काळ्या हळदीच्या पानावर मध्यभागी काळ्या रंगाची रेष असते. काळी हळद सहजा सहजी मिळत नाही. सर्वात उत्तम प्रत...

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

                                  पाणी, वानी आणि नानी नासु नये. घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी || शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा बेतावेत शब्द | शास्त्राधारे || बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके | ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे बोलावे बरे | बोलावे खरे | कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे || कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग | जातपात धर्म | काढूच नये || थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे | मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान , कर्म ,भक्ती | स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द || शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल | शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं || जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता | पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये    ~संत तुकाराम महाराज

अशी माझी प्रियसी असावी....

Image
                 अशी माझी प्रियसी असावी .. प्रेमाला प्रेम समजणारी अशी माझी प्रेयसी असावी मी जसा आहे तसेच माझ्यावर प्रेम करणारी असावी. स्मार्ट नसली तरी चालेल पण मनमिळाऊ असावी गुलाबाची कळी देत नसेल तरी प्रेमाने हाक मारणारे असावी. सिनेमातल्या ऐश्वर्यासारखी नसेल तरी चालेल पण घराला घरपण देणारी असवी. बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी चालेल पण अंगणातल्या तुळशीचे पावित्र्य समजणारी असावी. जीवनाच्या कठीण वाटचालीत नेहमी माझ्या सोबत असावी आणि मरेपर्यंत नेहमी माझ्या मनात असावी.            सुप्रसिद्ध कवी~रवींद्र शेलार

स्वप्न परी..

Image
                  स्वप्न परी.. आनंद झाला मला खूप तेव्हा ती माझ्याशी पहिल्यांदा बोलली तिच्या बोलण्याने माझी झोपच उडून गेली. झोपेत असताना वाटे हीच आपली स्वप्नपरी पण बोलण्याची हिंमत होत नव्हती जाऊन तिच्या घरी कॉलेजमध्ये गेल्यावर दररोज ती भेटायची पण माझे तुझ्यावर प्रेम आहे असे बोलण्याची हिंमत होत नसायची असे करता करता कॉलेजचे दिवस निघून गेले आणि तिच्याशी प्रेमाचे शब्द बोलायचे माझे स्वप्न ही उडून गेले ती मला सोडून गेली हीच आता निराशा आणि दुसरी परी पून्हा भेटावी हीच आता उरली आशा.                                          सुप्रसिद्ध कवी~ रवींद्र शेलार                                            

तिच्या लग्नानंतर ची पहिली भेट..

Image
        तिच्या लग्नानंतर ची पहिली भेट.. मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आले नाही पण खरच तुझ्या लग्नाला यायचं होतं काळजाच्या आकाराचे ग्रीटिंग अश्रूत भिजवून तुझ्या हिरव्या वोटीत द्यायचं होतं तुझं लग्न ठरलं त्यादिवशी पाय नकळत गेले बारा च्या गेट वर पण थबकलो थोडं भूतकाळाला केलं बोलक अन  म्हटलं   दारू पिऊन आजवर सांग ना कुणाचं दुःख झालं हल्क एक्सीडेंट मध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्ताळलोयआतून-बाहेरून तरी अजून खचलो नाही  काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून टीचलो नाही एखाद स्वप्न तुटल असेल माझं काळीज फुटलं असेल एक पोरगीच गेलीय आयुष्यातून तिन लुटून लुटून कीत्तीक लुटल असेल                                                 ~संदीप जगताप

दिलासा..

Image
                        दिलासा.. पेटलेला प्रत्येक दिवा उजेड देतो असेही नाही जोडणारा  प्रत्येक रिवाज सोबत येतो असेही नाही आला तो  जातोची एकदा हे जगाचे तत्व आहे ज्यांनी राखील्या आपल्या स्फूर्ती तेच खरे सत्व आहे येतीलही आता अनेक वादळे येतीलही आता महापुर समर्थपणे ध्यास कोंडत पडू नकोस नुसते उर दुःखाच्या गळ्यात पडून सुखासमोर रडू नकोस फुटतील जरी पंख परादुन फक्त एकदा उडू नकोस..                                                   ~चेतन ..

आठणीतील ती ..

Image
              आठवणीतील ती... काय करू काहीच सुचेना तुझ्या आठवणीत ही वेळ ही आता  संपेना . तुझ्यामुळे तर माझ्या गालावरती खळी खुलायची आस तुझी क्षणोक्षणी जानवायची. कडाक्याच्या थंडीत शेकोटीचा घेतो सहारा तुझ्या आठवणीत रात्रभर जागून करतो पहारा. बघुन तुला आता दिवस झाले खूप आता प्रत्येकामध्ये मला दिसते तुझेच रुप. आठवणीमध्ये तुझे विचार आले तुझा फोटो बघताना डोळ्यात  पाणी आले.                       सुप्रसिद्ध कवी~ रितेश सालके पाटील.

माझी बहीन.

Image
                माझी बहीण माझ्या आयुष्यातील मैत्रीण तू माझ्या मनातली मैत्रीण तू माझ्या आयुष्यातील सुख तू माझ्या प्रत्येक दुःखात साथ देणारी तू माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण तू माझ्या चुका मधील आधार तू माझ्या प्रत्येक चुका काढणारी तू माझ्या प्रत्येक चुकीला साथ देणारी तू माझ्या जीवनातील आकाश तू त्या आकाशाचा प्रकाश देणारी चांदणी तु गोड गुलाबाची कळी तू रक्षाबंधनाला राखी बांधणारी तू. प्रत्येक गोष्टीवरून भांडणारी तुझी चूक नसतानाही स्वारी बोलणारी तू बोट सोडून बाबांच परक्याचा हात  धरते तू एकही दिवस असा नसेल की आठवत नाही तू. अशीच साथ नेहमी दे तू प्रत्येक क्षणात सोबत राहा तू...                     सुप्रसिद्ध कवी~ रितेश सालके पाटील

पहीली भेट ......

Image
                       पहिलीभेट अस्वस्थ मन माझे जोरजोराने धडकत होते भेटण्यासाठी तीला कारण मिळालं होतं ती तर माझीच होणार होती तरी हृदय माझं वेडावलं होतं भेटीसाठी तिच्या मन माझे कासावीस होतो होत तिच्या सोबत माझ्या आयुष्याची स्वप्न रंगवत होतो दिवस खूप गोड होता वेळ जुळून आली वाट पाहण्यात बसलो तेवढ्यात ती आली थोडीशी लाजली अन गोड चेहर्यान   खुदकन हसली ती माझ्याकडे मी तिच्याकडे बघत होतो वेळ निघून चालली होती साथ मात्र काही सुटत नव्हती सुरुवात कशी करावी काहीच कळत नव्हतं बोलावं तर तिलाही वाटत होतं बोलावलं तर मलाही वाटत होत पण सुचत मात्र काहीच नव्हतं. जड झालेलं मन तिच्यापाशी हलक करावसं वाटत होतं मनातलं बोलायला भीती मात्र वाटत होती पण करणार तरी काय ती तर माझीच होणार होती ..                            सुप्रसिद्ध कवी:~ रितेश सालके पाटील.