अस्तिनातले निखारे

सध्याच्या राजकिय स्थिती

अस्तिनातले निखारे

निवडणुक आली जवळ
वडाच्या पारावरही रंगू लागल्या
राजकीय सभा
अन सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी
राजकिय पुढार्यांनी पिंजून काढला
महाराष्ट्र उभा...!!

हात जोडूनी नतमस्तक झाले
कुणी पडले सर्वसामान्यांच्या पाया
पाच वर्षे जनतेस लाथाडुन
सत्ताधारी अन विरोधक आले
बायबापड्यांचा आशिर्वाद घ्याया...!!

रोजच काय मग मटनाची पार्टी
अन दारूचे प्याले...
आधारस्तंभ हे उद्याचे
मदिरेच्या नशेत  झिंगले...!!

हजार पाचसे रूपयांसाठी
टाकला आम्ही आमचा
स्वाभिमान गहाण...
ओरडलोत त्यांच्यासाठी प्राणपनाने
पण त्यांनी समजले आम्हास पायताण...!!

गरज सरो अन वैद्य मरो
 म्हणतातना हेच खरे
असतात एकाच माळेचे मणी
सुई दोर्यात ओवले जातात सारे
भेटताच संधी फुलतात
अस्तिनातले निखारे...!!

       ~ज्ञानेश्वर दिगंबर काळे


Comments

Popular posts from this blog

काळी हळद महत्व ..

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

गरज मैत्रीच्या नात्याची.