तु सोबतच तर असतो,

तु सोबतच तर असतो,



तु सोबतच तर असतो,
तु दुर कधी गेलाच नाही,
माझ्या डोक्यात ,विचारांन मधे,
तुझ्याशीच तर बोलत असते,
तुझ्यावर रागवते,चिडते,तुझ्यावर
हसते,बघ ,
तु सोबतच तर असतो,
कधी दुर गेलाच नाही,
कधी कधी माझी इच्छा नसतांना
हसवतो,मला अजिबात हसावायच
नाही मला आज ,भाड़ायचे आहे,
तरी तु हसवनारच,
मला बोलायच नसत तरी बोलणारच,मला बोलत करणारच,
माझी राणी माझी सोनु बेटा बेटा,
करुन माघे माघे असणारच,बघ ना,
तु सोबतच तर असतो,
दुर कधी गेलाच नाही,
रोज जेवन करतांना सोबतच तर,
असतो,मला घास भरवनार,
पाणी सुध्धा तुच पाजनार,
मला टाकुन येक घास,खात नाही,
कुठे बसलाच जेवायला तरी म्हणतो,
बसतो ग जेवायला तु पन जेव,बघ ना,
तु सोबतच तरअसतो,
दुर कधी गेलाच नाही,
गेलोच कुठे फिरायला,
तर हातात हात गुफलेलाच असतो,
गजरा माळतेस का,
आन मी माळतो,
सोबतच आइसक्रीम खातो,
सोबतच चौपाटी वर फिरतो,
कुणा कुनाला घाबरत नाही,
बघ ना,
तु सोबतच तर असतो,
दुर कधी गेलाच नाही,
नसलाच कधी सोबत,
काही कारनास्तव,
तुझे प्रेम ,तुझा सहवास,तुझ्या सोबत,
घालवलेला प्रत्येक क्षण ,
फिरतो अवती भोवती,
बघ ना ,
तु सोबतच तर असतो,
दुर कधी गेलाच नाही,
तु तुझा गंधित श्वास ,
तुझी ती घट्ट विन,
तु असला तरी नसला तरी,
बघ ना,
तु सोबतच तर असतो,
दुर कधी गेलाच नाही,

   कवयत्री~ संध्याभांगरे,

Comments

Popular posts from this blog

काळी हळद महत्व ..

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

गरज मैत्रीच्या नात्याची.