वेडी माया (प्रेम कविता)

वेडी माया (प्रेम कविता)

पाहिले मी स्वप्न
वेड्या जीवाच्या आशेचे
कुठे शोधु गारवा
दिप ह्रदयात दुःखाचे!

वेड्या मनात आज
गोडवा मायेचा खास
ध्यास तुझा रात्रंदिन
नजरेत कोरडाच भास!

भरविला घास सुखाने
दुःखाचे जिंकले कडे
मायेच्या तुझ्या सुखात
गाईन आयुष्याचे पोवाडे!

डोळ्यात तुझी मूर्ती
चहुकडे मायेच्या भिंती
असे लिंपन संस्काराचे
हिच जीवनाची निती!

आयुष्याची असे जीवननौका
गातो समाधानात पारवा
नजरेत आज माझ्या
झोंबतो ममतेचा गारवा!

येशील कधी तु
हरविला वादळात किनारा
तुझ्याच प्रेमळ स्पर्शाने
गुंफीतो मी सहारा!

               कवि~गजानन चिंचमलातपुरे
     (अमरावती)

Comments

Popular posts from this blog

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

गरज मैत्रीच्या नात्याची.

काळी हळद महत्व ..