अशी माझी प्रियसी असावी....

                अशी माझी प्रियसी असावी..

प्रेमाला प्रेम समजणारी अशी माझी प्रेयसी असावी मी जसा आहे तसेच माझ्यावर प्रेम करणारी असावी.

स्मार्ट नसली तरी चालेल पण मनमिळाऊ असावी गुलाबाची कळी देत नसेल तरी प्रेमाने हाक मारणारे असावी.

सिनेमातल्या ऐश्वर्यासारखी नसेल तरी चालेल पण घराला घरपण देणारी असवी.

बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी चालेल पण अंगणातल्या तुळशीचे पावित्र्य समजणारी असावी.

जीवनाच्या कठीण वाटचालीत नेहमी माझ्या सोबत असावी आणि मरेपर्यंत नेहमी माझ्या मनात असावी.
           सुप्रसिद्ध कवी~रवींद्र शेलार

Comments

Popular posts from this blog

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

काळी हळद महत्व ..

माझी बहीन.