संस्कार ..

       संस्कार
आनंदाला आली भरती
फुले वाटेत संस्काराची
आपुलकीने बहरली नाती
उगवली पहाट मायेची!

होता किनारा वादळाचा
कुंठीत मती सुखाची
तुझ्या  प्रेमळ स्पर्शाची
ऊपमा असे संस्काराची!

नात्यात नसे अबोला
गंधाळला प्रीतीचा वारा
मायेच्या तुझ्या  पदराला
आसवांचा आधार खरा!

नको तोडुस भवबंध
मायेच्या तुझ्या  सावलीत
भिरकावु स्वार्थाची लक्तरे
बहरली ह्रदयात प्रीत!

तुझ्या आसवांचे मोल
मुखात संस्काराचे बोल
गाईन प्रीतीचे पोवाडे
आपुलकीची नजरेत सल!

धिक्कार असे स्वार्थाचा
रक्ताचा जिथे कोंडमारा
प्रेमाच्या तुझ्या  बागेत
गंधाळला आसमंत सारा!

              कवि~गजानन चिंचमलातपुरे
(अमरावती)

Comments

Popular posts from this blog

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

काळी हळद महत्व ..

माझी बहीन.