दर्शन ...

    ll दर्शन ll

आई तुझ्या भेटीसाठी
मन होई वेंधळं
तुळजाई ममता तुझी जणु
पाण्यानं भरलेलं कल्लोळ
पाहुनीया रूप तुझं
दिपलं माझं डोळं
भक्तीभावाचा वाजवुनी संबळं
घालीतो गं आई तुझा गोंधळ ll

अवघड किती तुळजापुराचा घाट
डोंगरातुनी जाते वळणाची वाट
आईचा माझ्या मराठमोळा थाट

वाहती गायमुखातुन अखंड त्या जलधारा
नवसाच्या पाळण्याला
नतमस्तक होई भक्तजण सारा
तुळजाई शेजारी आदिमाया शक्ती
पाप वासनेपासुनी देई ती मुक्ती ll

अखेर झाले आई तुझे दर्शन
पावण झालो तुझ्या पदस्पर्शानं
आई राजा उदो उदो
बोलतो मोठ्या हर्षानं

      कवी ~ज्ञानेश्वर दिगंबर काळे
(ब्रम्हगांवकर)
मुकुंदवाडी,औरंगाबाद.

Comments

Popular posts from this blog

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

काळी हळद महत्व ..

माझी बहीन.