डोळे रडून गेले.

         डोळे रडून गेले.


पाहून हाल माझे, सारे निघून गेले
ना सांगता मला रे, डोळे रडून गेले!

हे दुःख अंतरीचे, सांगू तरी कुणाला,
राखून ठेवलेले, नाते जळून गेले!

शेतात पीक माझ्या, आलेय जोम धरुनी,
बाजार भाव त्यांचा, कोणी गिळून गेले!

आश्वासने किती हो, देतात लोक नेते,
ते काम साधताना, कोठे पळून गेले!

सोसून घाव मोठे, आहे उभा किनारा,
ते दुःख या जगाचे, त्याला कळून गेले!

तापू नको गड्या तू,  होऊन सूर्य आता,
वेड्या तुझ्या धरेला, सारे हसून गेले!

विश्वास ठाम आहे, सांगून साथ केली,
पाहून संकटाला, सारे दुरून गेले!
        कवी~धनाजी जाधव.

Comments

Popular posts from this blog

काळी हळद महत्व ..

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

गरज मैत्रीच्या नात्याची.