आयुष्यं ...

      आयुष्य

आयुष्याची माती झाली अन्
नाती गोत्यात आली,
उभे कल्पवृक्ष तरू जळून गेले
अवस्था हीनदीन झाली.

सोडवायचे जे होते ते प्रश्नही उरले
झाकण्या न आभाळ पुरले,
मग असेच उडवून शब्दांचे फवारे
केले सैरभैर जनसैलाब सारे.

कुणी आकाशाला घाली गवसणी
स्वार्थ साधण्या सवय जुनी,
नांगरालाही मिळावी साथ घामाची
पिकवण्या सोने शेतातूनी.

पुन्हा तीच दरवळ,दर्प मातीचा
शिडकावा पावसाचा
तेच शरीर अन् तोच क्षणभंगूर
खेळ जीवनाचा.
        सुप्रसिद्ध कवयत्री~ कविता ताई कोर .

Comments

Popular posts from this blog

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

काळी हळद महत्व ..

माझी बहीन.