मायेची ओढ(प्रेम )

मायेची ओढ

वाटेत आज माझ्या
हसरी चांदण्यांची फुलबाग
लाभला तिमीरास सुवास
आळविन सप्तसुरांचा राग!

शोधीला तु बहाना
अश्रुंचा डोळ्यात खजाना
संघर्षाच्या तुझ्या वाटेत
गाईन मायेचा तराना!

प्रीतीच्या तुझ्या पंखावरी
मैफील मायेची रंगली
ओढ नजरेत प्रेमाची
भावना शब्दात गुंतली!

आठवणींची मनात गर्दी
आपुलकीची वाट मोकळी
मायेच्या तुझ्या अंगणात
फुलणार ह्रदयाची कळी!

शोधीला मी आसमंत
चहुकडे दुःखांचे डोंगर
ममतेचे शितल द्वार
गंधाळले बहीणीचे घर!

गहिवरली आठवण प्रेमाची
पाजळली संध्यासमयी ज्योती
दुर क्षितीजावर गहिवरली
ह्रदयात मायेची प्रीती!

...कवी~गजानन चिंचमलातपुरे
(अमरावती)

Comments

Popular posts from this blog

काळी हळद महत्व ..

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

गरज मैत्रीच्या नात्याची.