वळणावरचा खोपा..

वळणावरचा खोपा
-------------------------
परत कधी तरी वळतील
वळणावर पाऊले तुझी
ते काट्यांच कुंपण
तुला छळणार नाही !

छळले जरी मला
 त्या लाख सावलीने
उन्हाची तिरीपही आता
तुझ्यावर पडणार नाही !

बघ अजुनही डोलतो तिथे
तो खोपा सुगरणीचा
वाऱ्यासंगे झुलणाऱ्या खोप्यात तुला
पील्लाचा घोंगाट ऐकु येणार नाही !

बसतात तिथे आता
वटवाघुळांचे उलटे लटकलेले थवे
चमकऩाऱ्या डोळ्यात त्यांच्या आता
चांदण्यांची सर येणार नाही !

गेली रात उलटुनी अशीच आता
दिवस ही जातील रोज निघुनी
याद होती ती जुणी गं
आता पुन्हा नव्याने येणार नाही !


              कवी ~सुभाष उमरकर (नाशिक)

Comments

Popular posts from this blog

पाणी, वानी आणि नानी नासु नये.

काळी हळद महत्व ..

माझी बहीन.