गरज मैत्रीच्या नात्याची.

                     गरज मैत्रीच्या नात्याची.


मैत्री असावी अशी जशी  दुधात साखर विरघळते जशी
जणु सुखाची शिदोरी,ती असेल तर कुठलेच दुःख येत नाही पदरी. जिथे सर्व सामावून जाते.
आणि हीच मैत्री कधी प्रेमात रुपांतर घेते कळतच नाही.
 प्रेम ही अशी भावना आहे जी सहजासहजी आपल्याला समजत नाही.

प्रेम सहज कोणावर होत नाही आणि झालेच तर त्या प्रेमापोटी वाटेल ते करायची शक्ती आपल्यात येते.
निरव -प्रचिती दोघांची अशीच मैत्री जिचे रुपांतर प्रेमात झाले.
दिवस रात्र एकमेकांशी बोलणे .सर्व शेअर करणे असेच दिवस निघून जात होते.प्रेमाची कबुली एकमेकांना त्यांनी केव्हाच देऊन टाकली होतीआणि त्या प्रेमाला त्यांनी लग्नाच्या बेडीत  बांधून.सुरवातीचे दिवस अगदी स्वर्ग सुखात जात होते.हळू हळू निरव च्या वागण्यात बोलण्यात फरक जाणवू लागतं होता.आधीसारखे प्रेम आपुलकी जाणवत नव्हती.त्याने गूड मोर्निंग केल्याशिवाय जणू सूर्याला डोंगर आडून आकाशात यायची , आणि त्याने गूड नाईट केल्याशिवाय चंद्राला ढगातून बाहेर यायची परवानगी न्हवती.परंतु लग्नानंतर ह्या सर्वावर विरजण पडले होते.एकमेकांच्या ओढीत मानसिक प्रेमाचा गोडवा कमी व शरीर रसायनचा चढलेला नशा च अधिक असायचा.. अन् कालांतराने मग फक्त हे प्रेमाचा मुखवटा असलेले नाते टिकवण्यासाठी किंवा नात्यातील तडजोड म्हणा प्रचितीआपला संसार करत होती.ह्या सर्वाचा तिला विट आला होता.स्वतःला ह्यातून कुठे तरी गुंतवायचे असे तिने ठरवले.
आणि तिने जॉब करायला सुरुवात केली.
 त्या दरम्यान तिची ओळख आकाश शी झाली.कळत नकळत दोघांची भेट कामानिमित्त होत होती. आकाश चे ही लग्न झालेले होते.परंतु तो ही कुठल्यातरी टेन्शन मध्ये वावरत असे. प्रचिती स्वतःला सांभाळून नोकरी करत होती. परंतु दोघांमध्ये कधी निखळ मैत्री झाली हे दोघांनाही कळले नाही.वास्तविक एक पुरुष आणि एक स्त्री ह्यांच्यात लग्नानंतर मैत्री म्हणजे चर्चेला खमंग विषय. म्हणून प्रचिती -आकाश समाजाचे भान राखून होते.परंतु लोकांच्या नजरेतून त्यांच्या मैत्रीला गालबोट लागतं होते. दोघांना एकमेकांच्या सोबतीत आपुलकी, स्नेह मिळत होता .किंबहुना परस्परांन विषयी अंतर्यानी वाटणारी ओढ आणि स्त्री पुरुषांमधील प्रेमभावनेच्या पल्याड जाणाऱ्या आपुलकी, स्नेह, ममत्व ह्या साऱ्या भावना ह्या अनामिक नात्याला सामान्य मैत्रीच्या पलिकडे घेऊन जातात.आणि नात मैत्रीचं पण लग्नानंतरच ...एका वेगळ्या उंचीवर जाते.
 आजही असे कितीतरी कपल्स आहेत जे मैत्री ..प्रेम...लग्न करून पण सुखी नाहीत.आणि म त्यात कोणीतरी तिसरे येते. आणि म प्रेमाचा त्रिकोण होतो.हयात काहीजण प्रचिती आकाश सारखी लग्नानंतर ची निखळ मैत्री जपतात.आणि आपले सुख दुःख शेअर करतात.तर काहीजण त्या मैत्रीचा कहर करतात.  आपले दुःख शेअर करता यावे म्हणुन जाणून बुजून केलेली मैत्री आणि त्या मागे वासना हयात हरवून जातात. कधीही प्रेमाचा त्रिकोण होण्याआधी ते प्रेम समजून त्यात आपुलकी , स्नेह मैत्री ओतली तर प्रेमाचा त्रिकोण होणार नाही.
 दोघांनीही एकमेकांना वेळ आणि प्रेम दिले तर अश्या मैत्रीची गरज कोणालाच लागणार नाही.

        -अनिकेत पाटील

Comments

Popular posts from this blog

काळी हळद महत्व ..

पाणी, वानी आणि नानी नासु नये.