आयुष्य(प्रेम कवीता )

आयुष्य निष्पर्ण आयुष्यात माझ्या वाहतो मायेचा गारवा आसवांचे डोळ्यात पाट विसावला ह्रदयात पारवा! नजरभेटीची कहानी तुझी दुःखात आयुष्याची वाटणी प्रेमळ तुझ्या स्पर्शाने आनंदली जीवनाची कहानी! माझ्या आसवांचे मोल नजरेत मायेची ओल सहवासात आज तुझ्या मोगरा प्रीतीचा फुलेल! जाऊ नको दुर देशी विरहाची तुझी गाणी मायेच्या तुझ्या स्पर्शाने ओसंडले डोळ्यात पाणी! काहुर तुझ्या मनाचे ऊघडली आपुलकीची दारे वेदनेच्या तुझ्या वाटेत धिक्कारीन स्वार्थाची घरे! कवी~गजानन चिंचमलातपुरे अमरावती