गरज मैत्रीच्या नात्याची.

गरज मैत्रीच्या नात्याची. मैत्री असावी अशी जशी दुधात साखर विरघळते जशी जणु सुखाची शिदोरी,ती असेल तर कुठलेच दुःख येत नाही पदरी. जिथे सर्व सामावून जाते. आणि हीच मैत्री कधी प्रेमात रुपांतर घेते कळतच नाही. प्रेम ही अशी भावना आहे जी सहजासहजी आपल्याला समजत नाही. प्रेम सहज कोणावर होत नाही आणि झालेच तर त्या प्रेमापोटी वाटेल ते करायची शक्ती आपल्यात येते. निरव -प्रचिती दोघांची अशीच मैत्री जिचे रुपांतर प्रेमात झाले. दिवस रात्र एकमेकांशी बोलणे .सर्व शेअर करणे असेच दिवस निघून जात होते.प्रेमाची कबुली एकमेकांना त्यांनी केव्हाच देऊन टाकली होतीआणि त्या प्रेमाला त्यांनी लग्नाच्या बेडीत बांधून.सुरवातीचे दिवस अगदी स्वर्ग सुखात जात होते.हळू हळू निरव च्या वागण्यात बोलण्यात फरक जाणवू लागतं होता.आधीसारखे प्रेम आपुलकी जाणवत नव्हती.त्याने गूड मोर्निंग केल्याशिवाय जणू सूर्याला डोंगर आडून आकाशात यायची , आणि त्याने गूड नाईट केल्याशिवाय चंद्राला ढगातून बाहेर यायची परवानगी न्हवती.परंतु लग्नानंतर ह्या सर्वावर विरज...