Posts

गरज मैत्रीच्या नात्याची.

Image
                      गरज मैत्रीच्या नात्याची. मैत्री असावी अशी जशी  दुधात साखर विरघळते जशी जणु सुखाची शिदोरी,ती असेल तर कुठलेच दुःख येत नाही पदरी. जिथे सर्व सामावून जाते. आणि हीच मैत्री कधी प्रेमात रुपांतर घेते कळतच नाही.  प्रेम ही अशी भावना आहे जी सहजासहजी आपल्याला समजत नाही. प्रेम सहज कोणावर होत नाही आणि झालेच तर त्या प्रेमापोटी वाटेल ते करायची शक्ती आपल्यात येते. निरव -प्रचिती दोघांची अशीच मैत्री जिचे रुपांतर प्रेमात झाले. दिवस रात्र एकमेकांशी बोलणे .सर्व शेअर करणे असेच दिवस निघून जात होते.प्रेमाची कबुली एकमेकांना त्यांनी केव्हाच देऊन टाकली होतीआणि त्या प्रेमाला त्यांनी लग्नाच्या बेडीत  बांधून.सुरवातीचे दिवस अगदी स्वर्ग सुखात जात होते.हळू हळू निरव च्या वागण्यात बोलण्यात फरक जाणवू लागतं होता.आधीसारखे प्रेम आपुलकी जाणवत नव्हती.त्याने गूड मोर्निंग केल्याशिवाय जणू सूर्याला डोंगर आडून आकाशात यायची , आणि त्याने गूड नाईट केल्याशिवाय चंद्राला ढगातून बाहेर यायची परवानगी न्हवती.परंतु लग्नानंतर ह्या सर्वावर विरजण पडले होते.एकमेकांच्या ओढीत मानसिक प्रेमाचा गोडवा कमी व शरीर रसायनचा

आयुष्य(प्रेम कवीता )

Image
आयुष्य निष्पर्ण आयुष्यात माझ्या वाहतो मायेचा गारवा आसवांचे डोळ्यात पाट विसावला ह्रदयात पारवा! नजरभेटीची कहानी तुझी दुःखात आयुष्याची वाटणी प्रेमळ तुझ्या स्पर्शाने आनंदली जीवनाची कहानी! माझ्या आसवांचे मोल नजरेत मायेची ओल सहवासात आज तुझ्या मोगरा प्रीतीचा फुलेल! जाऊ नको दुर देशी विरहाची तुझी गाणी मायेच्या तुझ्या स्पर्शाने ओसंडले डोळ्यात पाणी! काहुर तुझ्या मनाचे ऊघडली आपुलकीची दारे वेदनेच्या तुझ्या वाटेत धिक्कारीन स्वार्थाची घरे! कवी~गजानन चिंचमलातपुरे अमरावती

तु सोबतच तर असतो,

Image
तु सोबतच तर असतो, तु सोबतच तर असतो, तु दुर कधी गेलाच नाही, माझ्या डोक्यात ,विचारांन मधे, तुझ्याशीच तर बोलत असते, तुझ्यावर रागवते,चिडते,तुझ्यावर हसते,बघ , तु सोबतच तर असतो, कधी दुर गेलाच नाही, कधी कधी माझी इच्छा नसतांना हसवतो,मला अजिबात हसावायच नाही मला आज ,भाड़ायचे आहे, तरी तु हसवनारच, मला बोलायच नसत तरी बोलणारच,मला बोलत करणारच, माझी राणी माझी सोनु बेटा बेटा, करुन माघे माघे असणारच,बघ ना, तु सोबतच तर असतो, दुर कधी गेलाच नाही, रोज जेवन करतांना सोबतच तर, असतो,मला घास भरवनार, पाणी सुध्धा तुच पाजनार, मला टाकुन येक घास,खात नाही, कुठे बसलाच जेवायला तरी म्हणतो, बसतो ग जेवायला तु पन जेव,बघ ना, तु सोबतच तरअसतो, दुर कधी गेलाच नाही, गेलोच कुठे फिरायला, तर हातात हात गुफलेलाच असतो, गजरा माळतेस का, आन मी माळतो, सोबतच आइसक्रीम खातो, सोबतच चौपाटी वर फिरतो, कुणा कुनाला घाबरत नाही, बघ ना, तु सोबतच तर असतो, दुर कधी गेलाच नाही, नसलाच कधी सोबत, काही कारनास्तव, तुझे प्रेम ,तुझा सहवास,तुझ्या सोबत, घालवलेला प्रत्येक क्षण , फिरतो अवती भोवती, बघ ना , तु सोबतच तर अ

मायेची ओढ(प्रेम )

Image
मायेची ओढ वाटेत आज माझ्या हसरी चांदण्यांची फुलबाग लाभला तिमीरास सुवास आळविन सप्तसुरांचा राग! शोधीला तु बहाना अश्रुंचा डोळ्यात खजाना संघर्षाच्या तुझ्या वाटेत गाईन मायेचा तराना! प्रीतीच्या तुझ्या पंखावरी मैफील मायेची रंगली ओढ नजरेत प्रेमाची भावना शब्दात गुंतली! आठवणींची मनात गर्दी आपुलकीची वाट मोकळी मायेच्या तुझ्या अंगणात फुलणार ह्रदयाची कळी! शोधीला मी आसमंत चहुकडे दुःखांचे डोंगर ममतेचे शितल द्वार गंधाळले बहीणीचे घर! गहिवरली आठवण प्रेमाची पाजळली संध्यासमयी ज्योती दुर क्षितीजावर गहिवरली ह्रदयात मायेची प्रीती! ...कवी~गजानन चिंचमलातपुरे (अमरावती)

वेडी माया (प्रेम कविता)

Image
वेडी माया (प्रेम कविता) पाहिले मी स्वप्न वेड्या जीवाच्या आशेचे कुठे शोधु गारवा दिप ह्रदयात दुःखाचे! वेड्या मनात आज गोडवा मायेचा खास ध्यास तुझा रात्रंदिन नजरेत कोरडाच भास! भरविला घास सुखाने दुःखाचे जिंकले कडे मायेच्या तुझ्या सुखात गाईन आयुष्याचे पोवाडे! डोळ्यात तुझी मूर्ती चहुकडे मायेच्या भिंती असे लिंपन संस्काराचे हिच जीवनाची निती! आयुष्याची असे जीवननौका गातो समाधानात पारवा नजरेत आज माझ्या झोंबतो ममतेचा गारवा! येशील कधी तु हरविला वादळात किनारा तुझ्याच प्रेमळ स्पर्शाने गुंफीतो मी सहारा!                कवि~गजानन चिंचमलातपुरे      (अमरावती)

डोळे रडून गेले.

Image
          डोळे रडून गेले. पाहून हाल माझे, सारे निघून गेले ना सांगता मला रे, डोळे रडून गेले! हे दुःख अंतरीचे, सांगू तरी कुणाला, राखून ठेवलेले, नाते जळून गेले! शेतात पीक माझ्या, आलेय जोम धरुनी, बाजार भाव त्यांचा, कोणी गिळून गेले! आश्वासने किती हो, देतात लोक नेते, ते काम साधताना, कोठे पळून गेले! सोसून घाव मोठे, आहे उभा किनारा, ते दुःख या जगाचे, त्याला कळून गेले! तापू नको गड्या तू,  होऊन सूर्य आता, वेड्या तुझ्या धरेला, सारे हसून गेले! विश्वास ठाम आहे, सांगून साथ केली, पाहून संकटाला, सारे दुरून गेले!         कवी~धनाजी जाधव.

अस्तिनातले निखारे

Image
सध्याच्या राजकिय स्थिती अस्तिनातले निखारे निवडणुक आली जवळ वडाच्या पारावरही रंगू लागल्या राजकीय सभा अन सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी राजकिय पुढार्यांनी पिंजून काढला महाराष्ट्र उभा...!! हात जोडूनी नतमस्तक झाले कुणी पडले सर्वसामान्यांच्या पाया पाच वर्षे जनतेस लाथाडुन सत्ताधारी अन विरोधक आले बायबापड्यांचा आशिर्वाद घ्याया...!! रोजच काय मग मटनाची पार्टी अन दारूचे प्याले... आधारस्तंभ हे उद्याचे मदिरेच्या नशेत  झिंगले...!! हजार पाचसे रूपयांसाठी टाकला आम्ही आमचा स्वाभिमान गहाण... ओरडलोत त्यांच्यासाठी प्राणपनाने पण त्यांनी समजले आम्हास पायताण...!! गरज सरो अन वैद्य मरो  म्हणतातना हेच खरे असतात एकाच माळेचे मणी सुई दोर्यात ओवले जातात सारे भेटताच संधी फुलतात अस्तिनातले निखारे...!!        ~ज्ञानेश्वर दिगंबर काळे